‘मुरांबा’ मालिकेत सात वर्षांचा लीप, ‘ही’ बालकलाकार साकारणार आरोहीची भूमिका; जाणून घ्या…
स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची आहे. नात्यांमधील गुंतागुंत, प्रेम आणि कुटुंबातील संबंधांवर आधारित ही मालिका आता सात वर्षांचा लिप घेणार आहे. मालिकेने ११०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. रमा-अक्षय यांच्या जोडीसह मुकादम कुटुंब प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. मालिकेत आता आरोही नावाची नवीन बालकलाकार आरंभी उबाळे दाखल झाली आहे. शशांक केतकरने मालिकेच्या यशाबद्दल आभार मानले आहेत.