“हा भांडणाचा शो आहे का?” ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात स्पर्धकांवर भडकला अमेय वाघ
स्टार प्रवाह वाहिनीवर 'शिट्टी वाजली रे' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमात अमेय वाघ सूत्रसंचालक असून शेफ जयंती कठाळे या परीक्षक आहेत. कार्यक्रमाच्या आगामी भागात अमेयचा राग अनावर झाला आहे. याचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'अबोली' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील कलाकारांमध्ये बाचाबाची होते. तेव्हा अमेयचा राग अनावर होतो. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.