“…तर कानाखाली असाच आवाज निघणार”, अर्णवला फसवणाऱ्या लावण्याला ईश्वरीने ‘असा’ शिकवला धडा
स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत अर्णव-ईश्वरीची केमिस्ट्री आणि नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना आवडत आहेत. अर्णव-ईश्वरीचं लग्न झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री आणि प्रेम वाढत आहे. लावण्याने अर्णवला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, पण ईश्वरीने तिला रोखलं. या घटनेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मालिकेतील आगामी भागांत लावण्याचा बदला कसा असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.