‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेला वर्ष होताच शिवानी सुर्वेने शेअर केली पोस्ट, म्हणाली…
स्टार प्रवाहवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेने १७ जानेवारीला एक वर्ष पूर्ण केले. शिवानी सुर्वे, समीर परांजपे आणि मानसी कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शिवानीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मालिकेच्या यशाबद्दल आभार मानले. याबद्दल तिने सहकलाकार आणि प्रेक्षकांना धन्यवाद म्हटलं आहे. दरम्यान, शिवानीच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्सआणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.