राकेशचा नवा डाव, ईश्वरीच्या बाबांचा अपघात करणार अन् अर्णववर येणार संशय; मैत्रीत फुट पडणार?
स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्णव-ईश्वरी यांची मैत्री आणि लव्हस्टोरीमध्ये ट्विस्ट आला आहे. अर्णवचा लावण्याशी साखरपुडा झाला, तर ईश्वरीचं राकेशशी लग्न ठरलं. राकेशचं खरे नाव राजेश असल्याचं अर्णवला कळलं, पण त्याने हे सत्य लपवलं. राकेशने ईश्वरीच्या बाबांचा अपघात घडवून अर्णवला फसवण्याचा प्लॅन केला आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.