लावण्याशी लग्न ठरलेलं असतानाच अर्णवने ईश्वरीशी बांधली लग्नगाठ, पुढे काय घडणार?
स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. अर्णव-ईश्वरीची जोडी लोकप्रिय आहे. अर्णवचे जिजू राकेश म्हणून ईश्वरीची फसवणूक करणार आहे. अर्णव-लावण्याच्या लग्नाच्या तयारीत अर्णव ईश्वरीच्या मदतीला धावून जातो. आगामी भागात अर्णव ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला पत्नी म्हणून स्वीकारतो. मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.