अपुरी झोप, थकलेलं शरीर अन्…; सलगच्या शुटींगमुळे अभिनेत्याची झाली ‘अशी’ अवस्था
टीव्हीवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील अभिनेता अभिजीत आमकरने त्याच्या मेहनतीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. मालिकेत लावण्या आणि ईश्वरीच्या लग्नाच्या सीनचं शूटिंग करताना त्याला आलेल्या अनुभवांची माहिती त्याने दिली आहे. अभिजीतने या धावपळीच्या आठवड्याबद्दल सांगितलं आणि त्याला मिळालेल्या अनपेक्षित आधाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याच्या पोस्टला चाहत्यांनी आणि कलाकारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.