मराठी अभिनेत्रीचं ‘विराट’ प्रेम! स्वत:च्या हातांनी काढलंय क्रिकेटरचं स्केच; म्हणाली…
विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने त्याच्यासाठी खास स्केच काढले. रुचिरा विराटची मोठी चाहती असून, तिने सोशल मीडियावर स्केच काढतानाचा व्हिडीओ शेअर केला. शूटिंगच्या व्यग्रतेतून वेळ काढत तिने हे स्केच काढले. रुचिराने विराटला शुभेच्छा देत म्हटले की, "तू क्रिकेटच्या आकाशातील सूर्य आहेस." रुचिरा सध्या 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत लावण्या ही भूमिका साकारत आहे.