‘ये हैं मोहब्बते’ फेम अभिनेत्री झाली आई, मुलाला दिला जन्म
‘ये हैं मोहब्बते’ मालिकेत रमन भल्लाच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिरीन मिर्झा आई झाली आहे. शिरीनने पती हसन सरताजबरोबर एक गोंडस मुलाचे स्वागत केले आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. दिव्यांका त्रिपाठी, रश्मी देसाई यांसारख्या कलाकारांनी शिरीन व हसन यांचे अभिनंदन केले आहे.