‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा आज शेवट! शिवानी रांगोळे भावुक म्हणाली, “२ वर्ष…”
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेच्या निरोपानिमित्त शिवानी रांगोळेने भावुक पोस्ट शेअर करत "२ वर्ष हसत, रडत, समजून घेत कुटुंबासारखे राहिलो आणि आज त्याच कुटुंबाला रेल्वे स्थानकावर निरोप देऊन सगळे आपापल्या वाटेला गेल्याची भावना आहे" असं म्हटलं आहे. तसंच यानिमित्ताने तिने झीच्या टीमचे, प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे आभार मानले आहेत.