महायुतीसमोर मनसे व मविआचं आव्हान? ठाण्यातून युतीचा शुभारंभ? आव्हाड VIDEO शेअर करत म्हणाले…
मुंबई व ठाणे महानगरपालिका निवडणुकीसह आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे (मनसे) व उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा) एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. ठाण्यात महाविकास आघाडी व मनसे नेत्यांची बैठक झाली. यात ठाण्यातील नागरी समस्यांवर चर्चा झाली. महायुतीविरोधात मनसे व महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भाजपा व शिंदे गटाची चिंता वाढली आहे.