Video:”आता भारत-पाकिस्तान छान राहणार ना?”ट्रम्प यांच्या प्रश्नावर शरीफ यांनी काय केलं पाहा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद मिटल्याचे आणि दोन्ही देश शांततेत राहतील असे विधान केले. त्यांच्या मागे उभे असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या हावभावांवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. गाझा पट्ट्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांचे शरीफ यांनी कौतुक केले आणि ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली.