“बंगळुरु आम्हाला हळूहळू मारतंय, लवकरच..”, व्यावसायिक दाम्पत्याची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
बंगळुरुतील व्यावसायिक जोडपे अश्विन आणि अपर्णा यांनी शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे बंगळुरु सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सांगितले की, शहरातील हवा रोगट असून त्यांना श्वसनाचे आणि इतर आजारांचे त्रास होत आहेत. त्यांच्या या पोस्टवर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांना तातडीने शहर सोडण्याचा सल्ला दिला आहे.