“भारतावर माझं खूप प्रेम आहे पण…”; दिल्लीत राहणाऱ्या अमेरिकेन महिलेचा व्हिडीओ चर्चेत
अमेरिकन महिला क्रिस्टीन फिशर, जी मागील चार वर्षांपासून दिल्लीत राहते, तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिने भारताबद्दल तिच्या अनुभवांची यादी सादर केली आहे. तिला भारतातील काही गोष्टी आवडल्या तर काही नाही. तिने भारतातील कुटुंब, अन्न, प्रदूषण, आणि स्वागत याबद्दल तिचे विचार मांडले आहेत. व्हिडीओला १.२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, अनेकांनी तिच्या विचारांचे कौतुक केले आहे.