Video: भारतीय महिलेच्या अमेरिकन पोलिसांसमोर गयावया; लाखभर रुपयांच्या वस्तू चोरीनंतर अटक!
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात अनाया अवलानी नावाची भारतीय महिला अमेरिकन पोलीस अधिकाऱ्यांसमोर गयावया करताना दिसत आहे. तिला Target Shop मध्ये १ लाख १० हजारांच्या वस्तू चोरी करताना अटक करण्यात आली. ती महिला टुरिस्ट व्हिसावर अमेरिकेत आली होती. सोशल मीडियावर या घटनेबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.