खान सरांनी चालू वर्गातच दिली लग्नाची बातमी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर…
सोशल मीडियावर चर्चेत असलेले आणि विद्यार्थ्यांचे आवडते 'ऑनलाईन' शिक्षक खान सर यांनी नुकतेच आपल्या वर्गात लग्नाची घोषणा केली. पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे छोटेखानी कार्यक्रमात लग्न केले. त्यांच्या आई आणि लहान भावाच्या आग्रहामुळे त्यांनी लग्न केले. विद्यार्थ्यांना आमंत्रित करता न आल्याची खंत व्यक्त करत, ६ जून रोजी विशेष रिसेप्शन आयोजित करण्याचे जाहीर केले.