पुण्यातील जिममध्ये व्यायाम करताना तरूणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, Video व्हायरल
पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एका जिममध्ये ३७ वर्षीय मिलिंद कुलकर्णी यांचा व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. व्यायाम करत असताना ते अचानक कोसळले. जिममधील कर्मचारी आणि इतर लोकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.