Youtuber लीला साहूसमोर अखेर प्रशासन झुकलं, गावातल्या रस्तादुरुस्तीला मुहूर्त!
गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबर लीला साहूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. भाजपा खासदार राजेश मिश्रा यांच्या वादग्रस्त विधानामुळे तिच्या मुद्द्यांना व्यापक समर्थन मिळालं. लीला साहूने गावातील रस्त्याच्या समस्येवर आवाज उठवला आणि अखेर प्रशासनाला झुकावं लागलं. काँग्रेस आमदार अजय सिंह राहुल यांनी स्वतःच्या पैशातून रस्त्याचं काम सुरू केलं आहे. लीला साहूच्या प्रयत्नांना यश आलं आहे.