Apple 16 Launch Event 2024 : आयफोनची (iPhone) क्रेझ तर जगभरात आहे. तुम्हीसुद्धा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासमोर दोन सोन्यासारख्या संधी चालून आल्या आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला अपडेटेड फीचर्स असणारा आयफोन १६ खरेदी करता येईल, तर दुसरं म्हणजे लवकरच कमी किमतीत उपलब्ध असणारा आयफोन १५ खरेदी करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच येत्या सोमवारी आयफोन १६ सीरिज लाँच होईल, तर या इव्हेंटमध्ये (Apple Event 2024 ) कोणते प्रोडक्ट लाँच होणार? तुम्हाला हा इव्हेंट कुठे लाइव्ह पाहता येणार हे आपण लेखातून सविस्तर जाणून घेऊ या…

तर आयफोन १६ सीरिज ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये लाँच करण्यात येईल. हा इव्हेंट सोमवार, ९ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता तर हा कार्यक्रम स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडणार आहे; जो तुम्ही ॲपलचा ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंट ( Apple Event 2024) यूट्यूब (YouTube) वर लाइव्हस्ट्रीम करू शकता. तसेच यंदा आयफोन दहावा वर्धापन दिन साजरा करणार असून ॲपलसाठी हा दिवस खूप खास असणार आहे. तर यूट्यूब व्यतिरिक्त तुम्ही हा इव्हेन्ट (Apple Event 2024) आणखीन कुठे पाहू शकता जाणून घेऊ या…

हेही वाचा…iPhone 16 Pro Max vs iPhone 15 Pro Max: आयफोन १६ साठी खर्च करणे किती फायद्याचे? पाहा ‘हे’ चार फीचर्स

ॲपल इव्हेंट पाहण्यासाठी पर्याय पुढीलप्रमाणे :

ॲपलची अधिकृत वेबसाइट : ॲपलच्या अधिकृत वेबसाइटद्वारे इव्हेंट पाहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. ॲपल सामान्यत: त्याच्या वेबसाइटवर त्याचे मुख्य कार्यक्रम थेट लाइव्ह करते, ज्यामुळे जगभरातील दर्शकांना पाहण्यासाठी सोयीस्कर ठरते. तर इव्हेंट पाहण्यासाठी https://www.apple.com/store ला भेट द्या आणि “ग्लोटाइम” इव्हेंट बॅनर शोधा. लाइव्ह ॲक्सेस करण्यासाठी त्यावर क्लिक करा.

ॲपल टीव्ही ॲप : तुमच्याकडे ॲपल टीव्ही हा ॲप असल्यास, तुम्ही इव्हेंट थेट तुमच्या टीव्हीवर पाहू शकता. Apple TV ॲप विशेषत: मुख्य कार्यक्रमाचे थेट लाइव्ह प्रक्षेपण करते. फक्त Apple TV ॲप डाउनलोड करा आणि “ग्लोटाइम” इव्हेंट सर्च करा.

यूट्यूब : ॲपल अनेकदा यूट्यूबवर त्यांच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे लाइव्ह स्ट्रीम करते, जे युजर्सना संगणक, टॅब्लेट किंवा स्मार्टफोनवर कार्यक्रम पाहण्यास प्राधान्य देतात त्यांच्यासाठी हा एक सोयीस्कर पर्याय ठरतात. YouTube वर “Apple Glowtime” सर्च करा आणि ॲपलचे अधिकृत Apple चॅनेल शोधा. तिथे तुम्हाला इव्हेंट लाइव्ह पाहता येईल.

ॲपल इव्हेंट ॲप : अधिक चांगल्या अनुभवासाठी, तुम्ही तुमच्या iPhone किंवा iPad वर Apple इव्हेंट ॲप डाउनलोड करू शकता. हा ॲप कार्यक्रम पाहण्यासाठी अधिक सोयीस्कर ठरेल.

तर भारतात हा इव्हेंट आपल्याला ९ सप्टेंबर, २०२४ रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी लाइव्ह पाहता येणार आहे.

नवीन आयफोन १६ सीरिजची किंमत किती असणार?

भारतात आयफोन १६ ची किंमत ७९,९०० पासून सुरू होईल. आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपयांपासून, तर आयफोन १६ प्रोची किंमत १,४४,००० रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर आयफोन प्रो मॅक्स १,७०,००० रुपयांपासून सुरू होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.