Google Maps हे फीचर आपल्या सर्वांच्या अतिशय मदतीचे ठरते. आपल्या एखाद्या ठिकाणी जायचे असेल पण आपल्याला रस्ता माहिती नसेल तर आपण या फीचर्सच्या मदतीने त्या ठिकाणापर्यंत पोचू शकतो. तसेच google सुद्धा वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळावा म्हणून app मध्ये नवनवीन फीचर्स जोडत असतात. गुगलने Google Immersive हे फिचर लॉन्च केले आहे. जे वापरकर्त्यांसाठी उपयुक्त असणार आहे. कंपनीने हे फिचर वापरकर्त्यांसाठी रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. काही कालावधीतच हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. Google I/O 2022 दरम्यान कंपनीने काही शहरांमध्ये इमर्सिव व्ह्यू फीचर लॉन्च करण्याबाबत माहिती दिली होती. काय आहे गुगलचे हे फीचर हे जनून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाकी काय आहे हे फिचर ?

गुगल मॅपच्या या फीचरमुळे तुम्हाला कुठेही न जाता त्या ठिकाणचा अनुभव घेता येणार आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाल्यास या फीचरच्या मदतीने वापरकर्ते कोणत्याही ठिकाणाला एक्सप्लोर करू शकतात. गेल्या महिन्यात फेब्रुवारी २०२३ मध्ये, Google ने लॉस एंजेलिस, लंडन, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि टोकियोसह ५ शहरांमध्ये इमर्सिव व्ह्यू फीचर आणण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा : Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनमधील नोकरी गेल्यामुळे कर्मचाऱ्याने शेअर केली भावूक पोस्ट; म्हणाला, “पहिलीच नोकरी…”

गेल्या महिन्यात फेब्रुवारी २०२३ मध्ये, Google ने लॉस एंजेलिस, लंडन, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि टोकियोसह ५ शहरांमध्ये इमर्सिव व्ह्यू फीचर आणण्यास सुरुवात केली होती. Google इमर्सिव्ह व्ह्यू हे फीचर हवेतील फोटोज अणि स्ट्रीट व्ह्यु यांचे कॉम्बिनेशन आहे जे हवामान अणि ट्राफिक डेटासह जगातील स्थानांचे वास्तववादी डिजिटल स्थान दर्शवते.

या फीचरबाबत असा सल्ला दिला जात आहे की, Google मॅप्सचे Immersive फिचर वापरण्यापूर्वी तुमचा फोन किंवा डिव्हाईस वायफायशी कनेक्ट करावे. Reddit वरील एका पोस्टमध्ये असे दिसून आले आहे की ३० मिनिटांसाठी इमर्सिव्ह व्ह्यू फीचर वापरल्याने २ GB डेटा संपतो. त्यामुळे तुमच्याकडे मर्यादित मोबाइल डेटा असल्यास, तुम्ही हे फिचर फक्त वायफायवर वापरावे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google maps immersive feature roll out for users check the all details tmb 01
First published on: 25-03-2023 at 16:54 IST