Google Maps Street View Feature: गुगल मॅप्सच्या मदतीने कोणत्याही अनोळखी ठिकाणी पोहोचणे सोपे झाले आहे. एखाद्या ठिकाणी पहिल्यांदा जायचे असेल तरी तिथपर्यंत कसे पोहोचायचे याबाबत गुगल मॅप्समुळे चिंता वाटत नाही. युजर्सना एखाद्या रस्त्याबाबत नीट माहिती मिळावी, एखाद्या पत्त्यावर पटकन पोहोचता यावे यासाठी गुगल मॅप्सवर स्ट्रीट व्ह्यू फीचर उपलब्ध आहे. पण या फीचरबाबत अनेकांना कल्पना नसते. हे फीचर कसे वापरायचे जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुगल मॅप्स स्ट्रीट व्ह्यू फीचरसाठी पुढील स्टेप्स वापरा

  • गुगल मॅप्स अ‍ॅप उघडा.
  • तुम्हाला जे लोकेशन शोधायचे आहे ते सर्च करून त्यावर होल्ड करा.
  • तळाशी असलेल्या जागेच्या पर्यायावर क्लिक करा.
  • खाली स्क्रोल करून फोटो असणाऱ्या ‘स्ट्रीट व्ह्यू’ पर्यायावर क्लिक करा.
  • हे फीचर अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर उपलब्ध आहे.

अशाप्रकारे तुम्ही गुगल मॅप्सवरील स्ट्रीट व्ह्यू फीचरचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला फोटोद्वारे अधिक स्पष्टरित्या एखाद्या पत्त्यावर पोहोचणे अधिक सोपे होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to use street view in google maps check easy steps pns