तुम्हाला तुमचा पीसी किंवा अन्य जसे की स्मार्टफोन , लॅपटॉप हे रिसेट करावे लागतात. मात्र त्या आधी त्याचा बॅकअप घेणे आवश्यक असतो. आज आपण विंडोज ११चे फॅक्टरी रिसेट कसे करावे हे समजून घेऊयात. Windows 11 विंडोज Reset करण्यापूर्वी त्यामधील फाईल्सचा आणि महत्वाचा बॅकअप घेणे आवश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फॅक्टरी रीसेट केल्यामुळे विंडोज ११ मधील सर्व डेटा डिलीट होतो. याचा वापर हा विंडोज आणि इतर ऑपरेटिंग सिस्टीममधील प्रॉब्लेम्स सोडवण्यास होतो. खाली दिलेल्या सेटप्सचा वापर करून तुम्ही विंडोज ११ चे फॅक्टरी रिसेट करू शकता.

हेही वाचा : …म्हणून Googleने भारतीय हॅकर्सना दिले चक्क १८ लाखांचे बक्षीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Step- 1. सर्वात प्रथम तुम्ही स्टार्ट बटणावर क्लिक करून सेटिंगचा पर्याय निवडा.

Step-2. त्यानंतर अपडेट आणि सिक्युरिटी मेनीमधून रिकव्हरी हा पर्याय निवडावा.

Step-3. नंतर स्टार्ट वर क्लीक करून पीसी रिसेट करावा.

Step-4. आता तुमच्या पर्सनल फाईल्स ठेवायच्या की नाही हा ऑप्शन सिलेक्ट करावा. फाईल्स डिलीटचा ऑप्शन सिलेक्ट केल्यास त्या फाईल्स कायमच्या डिलीट होतील.

Step-5. फॅक्टरी रिसेट प्रोसेस सुरु करण्यासाठी नेक्स्ट आणि मग रिसेट या ऑप्शनवर क्लिक करावे.

Step-6. या प्रोसेसला थोडा वेळ लागू शकतो.

हेही वाचा : Spotify Layoff: Spotify करणार पुन्हा कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

तुम्ही जर का या स्टेप्स फॉलो केल्यात तर विंडोज ११ चे फॅक्टरी रिसेट सहजपणे करू शकता. मात्र त्या आधी तुमचा महत्वाचा असणारा डेटा , त्याचा बॅकअप घ्यायला विसरू नका.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important files must be backup before doing a factory reset of windows 11 tmb 01