उद्या भारत देश आपला ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. यानिमित्ताने देशभरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यादरम्यान देशातील लोकप्रिय मोबाइल कंपनी असणाऱ्या Lava कंपनीने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. दिल्लीमधील नोएडा या ठिकाणी असलेल्या DLF मॉलमध्ये Lava Blaze 2 च्या १२०६ स्मार्टफोनच्या मदतीने सर्वात मोठा ऍनिमेटेड राष्ट्रीय ध्वज तयार केला आहे. या कंपनीच्या प्रयोगाचा समावेश गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाला आहे.
रेकॉर्ड ब्रेकिंग इव्हेंट
कंपनीचा हा इव्हेंट ११ ऑगस्ट रोजी आणि त्यात अॅनिमेटेड भारतीय ध्वजाचे प्रदर्शन करणाऱ्या स्मार्टफोनचे काळजीपूर्वक मांडणी केलेले मोज़ेक (mosaic) दाखवले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत अधिकाऱ्याने याची पुष्टी केली की या कलात्मक आणि तांत्रिक चमत्काराने एक नवीन जागतिक विक्रम केला आहे.
लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनी हा विक्रम मोडल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. जागतिक स्तरावर भारतीय तंत्रज्ञान यशस्वी होऊ शकत नाही या समजाला आव्हान देणारा हा विक्रम अग्नी 2 सारख्या भारतीय तंत्रज्ञान उत्पादनांच्या यशाचा हा रेकॉर्ड आहे.
Lava Blaze 2 बद्दल जाणून घ्या
Lava Blaze 2 या फोनमध्ये तुम्हाला ६.५ इंचाचा पंच होल HD डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. या फोनमध्ये ५ आणि ६ जीबीसह ११ जीबी रॅमचा पर्याय देखील देण्यात आला आहे. तसेच ५००० mAh ची बॅटरी आणि १८W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज यामध्ये आहे. हा फोन मल्टिटास्किंगला सपोर्ट करतो. सेफ्टी फीचर्समध्ये या फोनला फेसलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर्स देण्यात आले आहेत. Lava Blaze 2 हा स्मार्टफोन तुम्ही तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता. Glass Blue, Glass Black आणि Glass Orange हे तीन रंगांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. तसेच या फोनची किंमत ८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.