मोटोरोला ही एक मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. मोटोरोला कंपनीने चीनमध्ये लॉन्च केल्यानंतर भारतात आपला Moto G54 स्मार्टफोन लॉन्च तथापि स्मार्टफोनचे नाव एकसारखे असले तरी देखील ते स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपल्या फेब्रुवारीमध्ये लॉन्च झालेल्या मोटो E13 स्मार्टफोनकव्हे अपडेटेड मॉडेल बाजारात लॉन्च केले आहे. Moto G54 या स्मार्टफोनची किंमत, ऑफर्स, कॅमेरा , बॅटरी आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Moto G5 : फीचर्स

मोटोरोला मोटो जी ५४ यामध्ये वापरकर्त्यांना 3D अॅक्रेलिक ग्लास डिझाइन तसेच एफएचडी + ६.५ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. हा डिस्प्ले IPS एलसीडी प्रकारचा असून याचा आस्पेक्ट रेशो हा २०.९ आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२० Hz इतका असणार आहे. या फोनमध्ये मीडियाटेक Dimensity ७२० SoC चा सपोर्ट देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

हेही वाचा : Motorola SmartPhones: Moto E13 चे नवीन व्हेरिएंट लॉन्च; किंमत फक्त…

या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास मोटो जी ५४ मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. ज्याला ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह जोडण्यात आला आहे. व्हिडीओ कॉल्स आणि सेल्फीसाठी फोनमध्ये वापरकर्त्यांना १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तसेच या फोनला ३०W फास्ट चार्जिंगसह ६००० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे.

Moto G54 : भारतातील किंमत

मोटोरोला मोटो जी ५४ ची भारतातील किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु होते. यामध्ये ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १४,९९९ आणि १२/२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट असणाऱ्या मॉडेलची किंमत १८,९९९ रुपये आहे. खरेदीदार हा फोन मिंट ग्रीन, पर्ल ब्लू आणि मिडनाइट ब्लू या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. १३ सप्टेंबरपासून हा फोन फ्लिपकार्टद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moto g54 launch in india with 6000 mah battery 50 mp camera in 14999 rs check features tmb 01