Nothing Phone 2a हा स्मार्टफोन ५ मार्च रोजी भारतात तसेच जागतिक बाजारपेठांमध्ये लाँँच होणार असल्याची घोषणा नथिंग कंपनीने केलेली आहे. मात्र, लाँचच्या आधीच या फोनच्या विविध फीचर्सबद्दल अनुमान लावण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत. इतकेच नव्हे तर स्वतः नथिंग या ब्रँडने त्यांच्या युट्यूब चॅनेलवरून लाँच होणाऱ्या Nothing Phone 2a स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल थोडी माहिती दिली असल्याचे इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा मध्यम रकमेचे स्मार्टफोन हे त्यात वापरल्या जणाऱ्या हलक्या दर्जाच्या सामग्रीमुळे, तसेच बऱ्या प्रतीच्या सॉफ्टवेअरमुळे वापरकर्त्याला चांगला अनुभव देत नाहीत, असे नथिंगचे संस्थापक कार्ल पेई व्हिडीओमध्ये म्हणतात. त्यामुळे nothing आणि Nothing Phone 2a हा स्मार्टफोन वापरकर्त्यांना एक चांगला अनुभव देईल, असेदेखील त्यांचे मत आहे. “या Phone 2a मध्ये उत्तम काम करण्याची क्षमता, तसेच चांगला कॅमेरा असणे फार महत्त्वाचे आहे आणि अर्थातच त्यावर टीमने भरपूर काम केले आहे. त्यावर पूर्ण लक्ष दिले आहे. आमच्या डिझाइनमधील नावीन्य आणि सॉफ्टवेअर हेच आम्हाला सर्वांपासून वेगळे बनवते,” असे कार्ल पेई म्हणतात.

हेही वाचा : आता WhatsApp वर मेसेज वाचले तरी कुणाला कळणार नाही; हे कसे करायचे ते पाहा

इतकेच नाही तर इतर मध्यम किमतीच्या स्मार्टफोनच्या तुलनेत Phone 2a मध्ये हलक्या वजनाचा कॅमेरा सेटअप बसवण्यात येईल. नेमके या स्मार्टफोनचे कोणते फीचर्स समोर आले आहेत ते पाहू.

Nothing Phone 2a : फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत

डिझाइन

व्हिडीओमध्ये पेई यांनी त्यांच्या नव्या Nothing Phone 2a स्मार्टफोनची झलक दाखवली आहे. पूर्वीच्या मॉडेल्सप्रमाणे यामध्येही फिनिशिंग, टेक्सचर आधीसारखेच असून काळ्या रंगाचा पॅनेलदेखील आहे तसाच आहे. मात्र, यामध्ये Glyph LED मध्ये सुधारणा केलेली आपण पाहू शकतो. तसेच कॅमेऱ्याची जागादेखील होती तिथेच ठेवण्यात आली आहे.

प्रोसेसर

Nothing Phone 2a मध्ये कदाचित MediaTek Dimensity 7200 SoC प्रोसेसर बसवण्यात येईल. तसेच ८GB रॅम + १२८ GB स्टोरेज दिले जाऊ शकते. इतकेच नाही तर यामध्ये सध्याचे अँड्रॉइड 14 OS बसवले असेल, जेणेकरून वापरकर्त्यांना एक उत्तम अनुभव मिळण्यास मदत होईल.

हेही वाचा : काय! नेटफ्लिक्सनंतर Disney Plus देखील ‘पासवर्ड शेअरिंग’ करणार बंद!! माहिती जाणून घ्या

डिस्प्ले

या नव्या स्मार्टफोनमध्ये 120Hz OLED स्क्रीन बसवली आहे. सध्या अशा पद्धतीची स्क्रीन भारतातील मध्यम किमतींच्या उत्पादनांमध्ये सामान्य बाब बनली आहे. त्या स्क्रीनसह ६.७ इंचाचा पॅनेल असण्याची शक्यता आहे.

कॅमेरा

Nothing Phone 2a मध्ये मागच्या बाजूला दोन सेन्सर आणि ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असल्याचे म्हटले जात आहे.

किंमत

या स्मार्टफोनची म्हणजेच Phone 2a ची कंपनीच्या जुन्या फोनसह तुलना केली तर, आपण या नव्या किमतीचा अंदाज लावू शकतो. त्यानुसार, कदाचित नवीन येणारा Phone 2a हा स्मार्टफोन अधिक स्वस्त दारात मिळू शकतो. त्यानुसार हा फोन Nothing Phone (1) पेक्षाही कमी दारात उपलब्ध होऊ शकतो. Nothing Phone (1) ची मूळ किंमत ३२,९९९ रुपये इतकी होती, ज्याची सध्या २८,००० रुपयांना विक्री होत आहे, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

मात्र या सर्व चर्चा, अफवा किंवा अंदाज आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये नेमक्या कोणकोणत्या सोयी असतील, याची किंमत काय असेल ते मात्र हा फोन लाँच झाल्यानंतरच समजेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New smartphone nothing phone 2a is about to launch but lets take a sneak peak on features and specifications dha
First published on: 15-02-2024 at 18:46 IST