Nothing Phone 2 open sale in India to start today: Nothing ने या महिन्याच्या सुरुवातीला आपला दुसरा Nothing Phone 2 सादर केला आहे. कंपनीने गेल्या वर्षी आपला पहिला हँडसेट फोन १ सादर केला होता. फोन 2 आज विक्रीसाठी आला आहे. कंपनीने हा फोन आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक प्रीमियम किंमत आणि फीचर्ससह लॉन्च केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यामध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळेल. याशिवाय कंपनीने नवीन GLYPH इंटरफेस दिला आहे. Nothing Phone 2 ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. चला जाणून घेऊया त्याची किंमत आणि त्यासोबत उपलब्ध ऑफर्सची माहिती.

Nothing Phone 2 किंमत

कंपनीने हा फोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. या फोनमध्ये ८GB RAM + १२८GB स्टोरेज व्हेरिएंट ४४,९९९ रुपयांना येतो. त्याचवेळी, त्याचे १२GB RAM + २५६GB स्टोरेज वेरिएंट ४९,९९९ रुपयांना मिळेल. फोनचा टॉप व्हेरिएंट १२GB रॅम + ५१२GB स्टोरेजसह ५४,९९९ रुपयांना मिळेल.

(हे ही वाचा: Maruti Swift चा खेळ संपवायला लागली ‘ही’ टाटाची स्वस्त कार, खरेदीसाठी होतेय मोठी गर्दी, किंमत फक्त… )

कुठून खरेदी करता येईल?

तुम्ही फ्लिपकार्टवरून हँडसेट खरेदी करू शकाल. यावर अॅक्सिस बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ३ हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे. आज दुपारी १२ वाजतापासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

Nothing Phone 2 च्या पहिल्याच सेलमध्ये हा स्मार्टफोन घेणाऱ्यांना स्मार्टफोन सोबतच महागडे Nothing प्रोडक्ट्सही फ्रीमध्ये मिळणार, असे कंपनीने सांगितले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nothing phone 2 is set to go on its first sale in india today the smartphone will be available flipkart at 12pm pdb