जानेवारीप्रमाणेच फेब्रुवारी महिन्यातही नवनवीन स्मार्टफोन्स ग्राहकांसाठी लाँच होणार आहेत. त्यापैकी OnePlus 12 हा बाजारात आला आहे. आता OnePlus 12R हा स्मार्टफोन फेब्रुवारीच्या ६ तारखेपासून ग्राहकांना विकत घेता येणार आहे. हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर विक्रीदरम्यान काही बँक ऑफर्सचादेखील लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. सर्व ऑफर्स आणि कंपनीकडून मिळणाऱ्या काही खास मोफत गोष्टींबद्दल जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे OnePlus 12R या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि खासियत?

OnePlus 12R फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

स्क्रीन- या स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा AMOLED LTPO डिस्प्ले बसवला आहे. त्यामध्ये १२६४ x २७८० पिक्सेल रिझोल्युशन, ४,५००nits ब्राईटनेस, ३६०Hz टच सॅम्पलिंग रेट, १२०Hz रिफ्रेश रेट आहे. या स्क्रीनला सुरक्षेसाठी मजबूत गोरिला ग्लास लावलेली आहे.

हेही वाचा : अरेच्चा, Smartwatch आहे का स्मार्टफोन? ‘या’ डिव्हाईसमध्ये सोशल मीडिया ते गेमिंग सर्वांचा वापर करता येईल, पाहा…

कॅमेरा- उत्तम फोटोग्राफीसाठी ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यामध्ये ५० मेगापिक्सेल सोनी IMX890 प्रायमरी सेन्सर, primary sensor ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा लेन्स बसवलेली आहे. तसेच उत्तम सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरादेखील आहे.

बॅटरी – स्मार्टफोन भरपूर वेळ कार्यरत राहावा यासाठी ५,५०० इतक्या शक्तीची आणि १००W SuperVOOC एवढ्या प्रचंड चार्जिंग स्पीडला सपोर्ट करणारी बॅटरी बसवलेली आहे.

स्टोरेज आणि रॅम – OnePlus 12R या स्मार्टफोनमध्ये दोन स्टोरेज प्रकारची मॉडेल्स उपलब्ध असतील. त्यापैकी पहिले आहे बेस मॉडेल. त्यात ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज उपलब्ध असेल. तर दुसऱ्या व्हेरियंटमध्ये १६ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज दिलेले आहे.

हेही वाचा : Realme 12 Pro : ग्राहकांना तीस हजार रुपयांपेक्षा स्वस्तात मिळणार ‘एवढे’ फीचर्स! लाँच झालेल्या या स्मार्टफोनची खासियत पाहा

OnePlus 12R किंमत

OnePlus 12R ८ GB रॅम + १२८ GB स्टोरेज असणाऱ्या या बेस मॉडेलची किंमत ३९,९९९ रुपये असणार आहे.
OnePlus 12R १६GB रॅम + २५६GB स्टोरेज असणाऱ्या या मॉडेलची किंमत ४५,९९९ रुपये असेल.
६ फेब्रुवारी म्हणजे उद्या दुपारी १२ वाजल्यापासून [१२pm] या स्मार्टफोनची विक्री सुरू होईल.

तसेच यावर कोणत्या बँक ऑफर्स आहेत ते पाहा.
बँक ऑफर्स हा लाँचचाच एक भाग आहे. त्यामुळे OnePlus 12R खरेदी करताना आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर आणि वनकार्ड वापरकर्त्यांना १००० रुपयांची सूट मिळणार आहे. त्याचबरोबर OnePlus 12R खरेदी करणाऱ्यांना सहा महिन्यांचे गूगल वन सबस्क्रिप्शन आणि तीन महिन्यांचे यूट्युब प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळेल, अशी माहिती कंपनीने दिल्याचे इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : Smartphone launch : फेब्रुवारी महिन्यात लाँच होऊ शकतात हे उत्तमोत्तम स्मार्टफोन्स; पाहा लिस्ट अन् जाणून घ्या….

जर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरून सुरुवातीच्या २४ तासांत स्मार्टफोन ऑर्डर केल्यास OnePlus ४,९९९ रुपयांचे Buds Z2, OnePlus 12R बरोबर फ्री अॅसेसरीज मिळणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oneplus 12r ready for sale in india what is the date price bank offers and features check out all details dha
First published on: 05-02-2024 at 13:52 IST