POCO F5 5G launch: पोको ही स्मार्टफोन तयार करणारी एक मल्टिनॅशनल कंपनी आहे. या कंपनीद्वारे उत्तमोत्तम विद्युत उपकरणांचे उत्पादन केले जाते. पोको कंपनीच्या POCO F5 5G या स्मार्टफोनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ग्राहक या फोनच्या लॉन्चची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारपेठांमध्ये लॉन्च होणाऱ्या या नव्या फोनचा मॉडेल नंबर 23013PC75I हा असू शकतो. यामध्ये Snapdragon 7XX सीरीज प्रोसेसर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

POCO F5 5G चीनमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7XX सीरीज प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच QHD+ AMOLED डिस्प्ले पॅनल असे फीचर्स पाहायला मिळतील. त्यासह यात 1,400 nits पर्यंतची ब्राइटनेस आणि 1,920Hz PWM डिमिंग देखील उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 12 Turbo चे रीब्रांडेड व्हर्जन आहे असे म्हटले जात आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7 + Gen 2 चिपसेट उपलब्ध आहे. परिणामी POCO F5 5G मध्येही हा चिपसेट पाहायला मिळू शकतो.

या फोनमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजची क्षमता असणार आहे. नवीन Android 13 मोबाइल OS चा समावेश पोकोच्या नव्या स्मार्टफोनमध्ये केला जाऊ शकतो अशी ग्राहकांना आशा आहे. यात 67W फास्ट चार्जिंग सुविधा उपलब्ध असणार आहे. त्याव्यतिरिक्त यात 30W वायरलेस फास्ट चार्जिंगसाठी समर्थन असलेल्या 5,500mAh बॅटरी असणार आहे. POCO F5 5G भारतामध्ये ६ एप्रिलच्या आसपास लॉन्च होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत अजूनही गुलदस्त्यात आहे. कंपनीच्या POCO F4 5G या स्मार्टफोनची किंमत २७,००० रुपये इतकी आहे.

आणखी वाचा – जबरदस्त! ChatGPT ला विचारला प्रश्न अन् तरुणाचं नशीबच पालटलं; झाला लखपती, कसं ते जाणून घ्या

पोको कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टीमही जोडलेली असणार आहे. यात 50 mega pixels चा प्रायमरी शूटर आणि 8 mega pixels – 2 mega pixels चे सेकेंडरी शूटर समाविष्ट करण्यात येणार आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलकरिता 16 mega pixels शूटरही यामध्ये जोडण्यात येणार आहे. या कॅमेरा सिस्टीमसह एलईडी फ्लॅश असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poco f5 5g update company launched its new smartphone on 6 april 2023 read more yps