मोबाईल निर्मिती क्षेत्रात महत्वाची भूमिका असलेली क्वालकॉम ही आघाडीची संस्था आहे. स्मार्टफोन चिप निर्मिती करणाऱ्या क्वालकॉमने बुधवारी स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट लॉन्च केला. प्रोसेसिंग पॉवर, कनेक्टिव्हिटी, ग्राफिक्स रेंडरिंग, उत्तम गेमिंग, वेगवान 5G नेटवर्किंग आणि सुधारित कॅमेरा यामुळे अपग्रेड होईल. या व्यतिरिक्त नवी चिप 8K HDr रेकॉर्डिंगला सपोर्ट करेल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 या वर्षाच्या शेवटी आणि पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या टॉप एंड अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येईल. Xiaomi, ओप्पो, वनप्लस, विवो आणि मोटोरोला फोन निर्माते त्यांच्या आगामी स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 मोबाईल प्रोसेसर वापरणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 मागील वर्षी सादर केलेल्या स्नॅपड्रॅगन 888 SoC पेक्षा चारपट जलद कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कार्यप्रदर्शन असल्याचा दावा करण्यात आला आहे. पूर्वीपेक्षा २५ टक्के अधिक उर्जा कार्यक्षमतेसह ३० टक्के वेगवान ग्राफिक्स रेंडरींग वितरीत करण्याचे देखील सांगितले जाते. याव्यतिरिक्त, स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 हा सुसंगत नेटवर्कवर १० Gigabit डाउनलोड गती गाठण्यासाठी जगातील पहिला 5G मॉडेम-RF सोल्यूशन असल्याचा दावा केला जातो.

ट्विटरवर संमतीशिवाय इतरांचे फोटो शेअर करता येणार नाही; कारण…

क्वॉलकॉमने स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 मध्ये स्नॅपड्रॅगन X65 5G मॉडेम-RF सिस्टम तयार केली आहे. त्यामुळे १० Gigabit डाउनलोड गतीप वाढवण्यास मदत होईल. नवीन चिपने क्वॉलकॉम कनेक्टिव्हिटी सिस्टम चांगली होईल. Wi-Fi 6 आणि Wi-Fi 6E मानकांवर 3.6Gbps पर्यंत वायरलेस कनेक्टिव्हिटी देईल आणि ब्लूटूथ v5.2 ला सपोर्ट देखील आहे. “स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिप भविष्यातील उपकरणासाठी मानक ठरेल. त्यामुळे मोबाईल निर्मिती क्षेत्रात मैलाचा दगड असेल.”, असं क्वॉलकॉम टेक्नोलॉजीचे उपाध्यक्ष अ‍ॅलेक्स काटोझियन यांनी सांगितलं. क्वालकॉमच्या प्रगत मोबाइल चिप्स भविष्यात हाय-एंड अँड्रॉइड स्मार्टफोन कसा असू शकतो?, हे सूचित करतात. क्वालकॉमच्या प्रगत स्नॅपड्रॅगन चिप्समधील वैशिष्ट्ये आणि कार्यप्रदर्शन सुधारणा अँड्रॉइड निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अ‍ॅप्पल आणि त्याच्या A-सिरीज मोबाइल चिप्सशी स्पर्धा करण्यास मदत करतील. दरवर्षी सॅन डिएगो-आधारित चिप टायटन वर्षाच्या अखेरीस त्याच्या पुढील पिढीतील मोबाइल चिपची घोषणा करत असते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Qualcomm announced snapdragon 8 gen 1 chip high end mobile processor rmt