Redmi ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. अशाच आणखी एका नव्या स्मार्टफोनची घोषणा बुधवारी रेडमीने केली आहे. रेडमी कंपनी आपला Redmi Note 12 Turbo हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. यामध्ये वापरकर्त्यांना अनेक नवीन फीचर्स, स्पेसिफिकेशन्स मिळणार आहेत. या लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनबद्दल अधिक जाणून घेऊयात.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
काय आहेत फीचर्स ?
स्मार्टफोन अधिकृत लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने काही महत्वाच्या फीचर्सबद्दल सांगितले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, Redmi Note 12 Turbo नवीन Qualcomm Snapdragon प्रोसेसरसह नवीन बेंचमार्क सेट करेल.पड्रॅगन 7 Gen 1 प्रोसेसरच्या तुलनेत, या प्रोसेसरची कार्यक्षमता 50 टक्के चांगली असल्याचा दावा करण्यात आला आहे. क्वालकॉमचा दावा आहे की स्नॅपड्रॅगन 7+ जनरल 2 प्रोसेसर त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा १३ टक्के अधिक कार्यक्षम आहे.
हेही वाचा : Tech Layoff: नोकऱ्या मिळवून देणाऱ्या ‘या’ कंपनीतच होणार २ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात
कॅमेरा
परफॉर्मन्स व्यतिरिक्त Xiaomi ने फोनच्या डिझाईनबद्दल देहिल खुलासा केला आहे. Redmi Note 12 Turbo हा Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro Plus 5G सारखा दिसतो जो चीन आणि भारतात लॉन्च झाला होता. या फोनमध्ये मागील बाजूस तीन गोल कॅमेरा रिंग आहेत. कंपनीने लॉन्च केलेल्या इट्झरूसार फोनमध्ये ६४ मेगापिक्सलमध्ये प्रायमरी कॅमेरा सेन्सर असणार आहे. तसेच इतर दोन कॅमेरे अल्ट्रा वाईड आणि मॅक्रो लेन्स असतील. तसेच एलईडी फ्लॅश मोड्यूल देखील यामध्ये वापरकर्त्यांना मिळणार आहे.
Xiaomi च्या नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.६७ इंचाचा फुलएचडी प्लस OLED डिस्प्ले मिळणार आहे. याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. या फोन १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकतो. दुसरीकडे फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला ५,५००mAh ची बॅटरी आणि त्याला ६७W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ऑडिओ जॅकचा सपोर्ट मिळू शकतो.