Premium

गूगलवर आहे खास ‘Hidden’ ॲप! पाहू शकता हवामानाचा अंदाज; कसे इन्स्टॉल कराल? जाणून घ्या….

गूगल ॲपचेही स्वतःचे एक ‘हिडन’ ॲप आहे. हे ॲप अलीकडेच अपडेट केले गेले आहे…

There is a special Hidden app on Google You can see the weather forecast How to install on your android phone
(सौजन्य: लोकसत्ता.कॉम) गूगलवर आहे खास 'Hidden' ॲप! पाहू शकता हवामानाचा अंदाज; कसे इन्स्टॉल कराल? जाणून घ्या….

आपल्या स्मार्टफोनमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट ॲप आहे. काही ॲप मोबाईलमध्ये इनबिल्ड असतात; तर काही ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यावे लागतात. तसेच हवामान (Weather) ॲपचा विचार केला, तर ॲण्ड्रॉइड वापरकर्त्यांना यासाठी अधिक पर्याय असतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? गूगल ॲपचेही स्वतःचे एक ‘हिडन’ वेदर ॲप आहे. हे ॲप अलीकडेच मटेरियल यू डिझाइनसह (Material You design) अपडेट केले गेले आहे. तसेच हे हिडन वेदर ॲप तुम्ही प्ले स्टोअरवर शोधू शकणार नाही. कारण- हे ॲप गूगलचाच एक भाग आहे. पण, तुमच्या फोनमध्ये हे ॲप तुम्हाला सहज घेता येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गूगल वेदर ॲप (Google’s Weather app) कसे डाउनलोड कराल?

१. तुमच्या फोनमध्ये असणारे गूगल ॲप ओपन करा.
२. गूगलच्या सर्च बारमध्ये हवामान (Weather) असे लिहून सर्च बटनावर क्लिक करा.
३. तुमच्या स्क्रीनवर Weather असे लिहिलेले दिसेल. त्याच्या शेजारी तीन डॉट दिसतील. तीन डॉटवर क्लिक केल्यावर ॲड टू होम स्क्रीन (Add To Home Screen) या पर्यायावर क्लिक करा.
४. तुमच्या स्क्रीनवर गूगल वेदर ॲप दिसण्यासाठी तुम्ही ॲडवर (Add) क्लिक करा. आता तुमच्या फोनवर तुम्हाला गूगलचे वेदर ॲप दिसू लागेल.

हेही वाचा…गुगल क्रोम Vs मायक्रोसॉफ्ट एज! कोण आहे बेस्ट ? ‘ही’ तीन कारणं पाहा…

जेव्हा तुम्ही गूगलच्या सर्च बारमध्ये हवामान हे सर्च करता, तेव्हा तिथे तुम्हाला तीन पर्याय दिसतात. त्यात तुम्ही आज (Today), उद्या (Tomorrow) आणि पुढील १० दिवसांचे (10 Days)सुद्धा हवामान पाहू शकता. तसेच जर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर गूगल वेदर ॲप नको असेल तर तुम्ही ते काढूनदेखील टाकू शकता. त्यासाठी या गूगलच्या वेदर ॲप आयकॉनवर लॉंग प्रेस करा आणि Remove करा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: There is a special hidden app on google you can see the weather forecast how to install on your android phone asp

First published on: 01-12-2023 at 11:00 IST
Next Story
भारतात शाओमीची ‘ही’ दोन मॉडेल्स डिसेंबरमध्ये होणार लॉंच; पाहा काय आहे तारीख आणि फीचर्स….