WhatsApp Deleted Mesages Undo Feature : व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे ज्याद्वारे यूजर्स डिलीट केलेले मेसेज अनडू करू शकतील. व्हॉट्सअॅपशी संबंधित बातम्यांचा मागोवा घेणाऱ्या WaBetaInfo वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या बीटा फेजमध्ये आहे आणि त्याची चाचणी केली जात आहे. हे फीचर Meta च्या इन्स्टंट मेसेजिंग सेवेच्या मालकीच्या WhatsApp Android बीटा अॅपच्या 2.22.13.5 वर्जनवर उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहवालानुसार, ‘व्हॉट्सअॅप सध्या फक्त काही निवडक बीटा यूजर्ससाठी हे फीचर आणत आहे, जे चुकून डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करू शकतात.’ रिपोर्टमध्ये युजर्स डिलीट केलेले मेसेज कसे रिकव्हर करू शकतात हे स्पष्ट करते. जर एखाद्या यूजरने मेसेज डिलीट केला तर त्याला लगेच एक बार दिसेल ज्यामध्ये अनडूचा ऑप्शन क्लिक करून मेसेज पुन्हा मिळवू शकता. वेबसाइटनुसार, हा बार तेव्हाच उघडेल जेव्हा अॅपला कळेल की तुमच्यासाठी मेसेज डिलीट झाला आहे. डिलीट झालेला मेसेज पुनर्प्राप्त करण्यासाठी यूजरकडे काही सेकंद असतील. लक्षात ठेवा की हा बार ‘Delete for me’ पर्यायावर दिसणार नाही.

आणखी वाचा : Apple iPhone 14 वरून येत्या ६ सप्टेंबर रोजी पडदा हटणार, लॉंचपूर्वीच लीक झाली ही माहिती

तुम्हाला या फीचरची चाचणी करायची असल्यास, तुम्हाला WhatsApp बीटा प्रोग्रामसाठी नावनोंदणी करावी लागेल आणि अॅप Google Play Store वरून अपडेट करावे लागेल. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही इंटरनेटवरून नवीन बीटा एपीके देखील डाउनलोड करू शकता.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की व्हॉट्सअॅप सतत नवीन अपडेट्सद्वारे आपल्या यूजर्ससाठी फीचर्स आणत आहे. व्हॉट्सअॅप विंडोज यूजर्सना उत्तम वेब अनुभव देण्याच्या उद्देशाने नुकतेच एक अॅप लाँच करण्यात आले. जवळपास एक वर्ष चाचणी केल्यानंतर, अखेर हे फीचर आता सर्व यूजर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनीचे म्हणणे आहे की नवीन अॅप आल्याने यूजर्सना चांगला स्पीड मिळेल.

नवीन अॅपच्या परिचयानंतर, यूजर्सना मेसेज आणि नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी फोन कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आता फोनवर ऑनलाइन न येता लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून WhatsApp चालवता येणार आहे. आतापर्यंत डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप चालवण्यासाठी फोन जवळ ठेवून कनेक्ट करावा लागत होता. युजर्स हे अॅप मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp deleted messages recover feature coming soon users will be able to undo prp
First published on: 18-08-2022 at 21:57 IST