whatsapp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या ग्राहकांसाठी व्हाट्सअॅप अनेक नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. गेल्या काही दिवसांत व्हाट्सअॅपने अनेक नवीन फीचर्स लॉन्च केली आहेत. व्हाट्सअॅप, फेसबुकची मूळ कंपनी असणाऱ्या मेटाने व्हाट्सअॅपसाठी एक नवीन फिचर आणले आहे. हे नवीन फिचर नक्की काय आहे आणि याचा वापरकर्त्यांना काय फायदा होणार आहे, हे जाणून घेऊयात. मेटाने डेस्क्सटॉप वापरकर्त्यांसाठी WhatsApp Desktop App लॉन्च केले आहे. WhatsApp हे App विंडोजसाठी लॉन्च केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळणार आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत इंस्टाग्राम आणि फेसबुक पोस्टद्वारे अधिकृत घोषणा केली आहे. हेही वाचा : Tech Layoff: नोकऱ्या मिळवून देणाऱ्या ‘या’ कंपनीतच होणार २ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात काय मिळणार फीचर्स ? मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये असे सांगितले की, नवीन WhatsApp डेस्कटॉपद्वारे विंडोज वापरकर्ते एकाच वेळी ८ लोकांसोबत व्हिडिओ कॉलमध्ये सामील होऊ शकतात. तसेच ३२ जण ऑडिओ कनेक्ट होऊ शकतात. यामधील सर्वात खास बाब म्हणजे हे App मेसेजिंग, मीडिया आणि कॉलसाठी सुधारित एन्क्रिप्शन आणि नवीन फीचर्स, एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचर्ससह येणार आहे. व्हाट्सअॅपचे नवीन डेस्कटॉप App मध्ये अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत. या डेस्कटॉप App मध्ये लिंक प्रिव्हयु आणि स्टिकर्सचे फिचर देण्यात आले आहेत. तसेच तुम्ही ते Microsoft Store ला भेट देऊन ते डाउनलोड करू शकता. याशिवाय व्हाट्सअॅपच्या या वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकता.