Chat GPT: चॅट जीपीटी हे नुकताच लाँच झालेले आहे. चॅट जीपीटी एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून काही लोक याला दुसरे Google देखील म्हणत आहे. सध्या सगळीकडे आता चॅट जीपीटीची चर्चा होऊ लागली आहे. गेल्या वर्षअखेरीपासून देशभरात अनेकांनाच नोकरी गमवावी लागली. फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात ही परिस्थिती पाहायला मिळाली. अगदी ट्विटरपासून अॅमेझॉनपर्यंत बड्या कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आलाय. आता चॅट जीपीटीमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, नोकऱ्यांवर गंभीर परिणाम करू शकतो का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॅट जीपीटी बाजारात दिसू लागल्यावर प्रत्येकाच्या मनात प्रश्न येऊ लागला की, यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. विशेषत: कंटेंट रायटर्स आणि लेखकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, असे ठामपणे बोलले जात होते. दरम्यान, चॅट जीपीटीची मूळ कंपनी ओपन एआयने एक अहवाल शेअर केला आहे ज्यामध्ये कंपनीनेच सांगितले आहे की, आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कोणाच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. ओपन रिसर्च आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाने एक अहवाल प्रकाशित केला आहे ज्यामध्ये हे सांगण्यात आले आहे की, एआयमुळे कोणते लोक त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात आणि कोणाच्या नोकऱ्या सुरक्षित आहेत.

(हे ही वाचा : अवघ्या एका सेकंदात तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारं ChatGPT काय आहे माहितेयं का? गुगललाही देणार टक्कर? )

‘या’ लोकांची नोकरी धोक्यात

Mathematicians
Tax Preparers
Financial Quantitative Analysts
Writers and Authors
Web and Digital Interface Designers
Court Reporters
Simultaneous Captioners
Proofreaders
Copy Markers
Accountants
Auditors
News Analysts
Journalists
Administrative Assistants

‘या’ लोकांची नोकरी सुरक्षित

Agricultural Equipment Operators
Athletes and Sports Competitors
Auto Mechanics
Cement Masons
Cooks
Cafeteria Attendants
Bartenders
Dishwashers
Electrical Power-Line Installers and Repairers
Carpenters
Painters
Plumbers
Meat, Poultry, and Fish Cutters and Trimmers
Slaughterers and Meat Packers
Stonemasons

(हे ही वाचा : आता वकिलाचीही गरज नाही! ChatGPT ने परत मिळवून दिले अडकलेले कोट्यवधी रुपये; वाचा नेमकं काय घडलं?)

ओपनएआयचे सीईओ म्हणाले की,…

दुसरीकडे, एका मुलाखतीत खुद्द ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सांगितले की, एआयमुळे भविष्यात अनेक लोकांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील याची त्यांना काळजी आहे. याला थोडा वेळ लागेल, असे त्यांनी सांगितले असले तरी ही शिफ्ट वेगाने झाली तर त्रास होऊ शकतो. याशिवाय सॅम ऑल्टमन म्हणाले की, अलीकडच्या काळात लोकांनी ज्या प्रकारे नवीन तंत्रज्ञान स्वीकारले आहे ते स्वतःच आश्चर्यकारक आहे. मानवी सर्जनशीलता अमर्याद आहे. आपण सर्वांनी चॅट जीपीटीकडे एक साधन म्हणून पाहिले पाहिजे.

काही काळापूर्वी ओपन एआयने चॅट GPT 4 लाईव्ह केले आहे. ही एक अपडेटेड आवृत्ती आहे ज्यामध्ये लोक फोटोंद्वारे देखील प्रश्न विचारू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही चॅट GPT ३.५ पेक्षा अधिक प्रगत आणि परिपूर्ण आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whose job is in danger and who is safe from chat gpt openai itself told this know about yourself pdb
First published on: 22-03-2023 at 18:54 IST