Tips To Reduce Electricity Bill: आजकाल प्रत्येक घरात Electronic Devices चा वापर वाढला असून यामुळे वाढते लाईट बिल अनेकांची डोकेदुखी बनले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला घराचे वीज बिल कमी करायचे असते. परंतु, अनेक उपकरणांच्या सतत वापरामुळे हे शक्य होत नाही. पण, काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला अशा उपकरणाविषयी टिप्स देणार आहोत. या उपकरणाच्या मदतीने तुम्हाला तुमच्या घराचे वीज बिल कमी करता येणार आहे. तुम्हाला यात कोणतीही अडचण येणार नाही. चला या उपकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
पोर्टेबल सोलर जनरेटर उपकरण
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल किंवा वीज बिल खूप जास्त असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या घरात पोर्टेबल सोलर जनरेटर लावू शकता. याचा वापर करून घरातील सर्व इलेक्ट्रिकल उत्पादने चालू शकतात. ते वापरण्यासाठी विजेची गरज लागत नाही.
पोर्टेबल सोलर जनरेटर उपकरणाची वैशिष्ट्ये
पोर्टेबल सोलर जनरेटर सूर्यप्रकाशाने चार्ज होते. मात्र, जर तुम्ही ते सूर्यप्रकाशाने चार्ज करू शकत नसाल, तर तुम्ही फोनप्रमाणे चार्जर लावून चार्ज करू शकता. यात चार्जिंग पॉवर प्लग आणि चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट देखील आहे.
याचा वापर घर आणि कार्यालयात वीज म्हणून करता येतो. घरगुती उत्पादने किंवा मोबाइल फोन पूर्ण चार्ज केल्यानंतर या उपकरणाद्वारे चार्ज करता येतात. याशिवाय पंखा, एसी आणि कुलरचाही वापर करता येतो. यात म्युझिक सिस्टीम आणि इन-बिल्ट बॅटरीसारखे फीचर्स आहेत.
पोर्टेबल सोलर जनरेटर उपकरणाची किंमत
पोर्टेबल सोलर जनरेटरची किंमत १०,००० ते १५,००० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You can reduce your electricity bill by installing a portable solar generator device at home pdb