इंटिग्रेटेड मशीन
थर्ड जनरेशन प्रोसेसर
एचपीच्या या एनव्ही २३ टचस्मार्टमध्ये थर्ड जनरेशन इंटेल कोअर आय फाइव्ह- ३४७० एस हा क्वाड कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तो २.९ गिगाहर्ट्झ या वेगात काम करतो आणि त्याचा वेग ३.६ पर्यंत वाढण्याची त्याची क्षमता आहे. त्यासाठी एचपीने तब्बल २३ इंची पूर्णपणे फ्लश काच असलेला मॉनिटर स्क्रीन दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा टचस्मार्ट असा स्क्रीन आहे. १० पॉइंट टचस्क्रीनची त्याची क्षमता आहे. पूर्णपणे टचस्क्रीन अनुभव देण्यासाठी त्याचा की बोर्ड मशीनच्या खालच्या बाजूस व्यवस्थित राहील, अशी त्याची रचना करण्यात आली आहे.
एचडी वेबकॅम
बीट्स ऑडिओसह असलेले स्पीकर्स हे या नव्या डेस्कटॉपचे वैशिष्टय़ तर आहेच, पण त्याचबरोबर यात एचडी वेबकॅम आणि मायक्रोफोनही सोबत देण्यात आला आहे. आताशा लोकांना भरपूर साठवणूक क्षमता हवी असते. ५०० जीबी ही आता जुनी कल्पना झाली असून आता एक टेराबाईट हे स्टँडर्ड म्हणून स्थिरावू पाहते आहे. या नव्या डेस्कटॉपची क्षमतादेखील १ टेराबाइटचीच आहे. शिवाय सोबत ४ जीबी रॅम, एनव्हीडिआ जीफोर्स ग्राफिक कार्ड हेही आहेच.
विंडोज ८
आता यापुढे आपल्याला अद्ययावत असे मशीन घ्यायचे तर त्यासोबत िवडोज आठ असणे हे अनिवार्य आहे. िवडोज आठ म्हणजे अद्ययावतता, असेच नवे समीकरण असणार आहे. या विंडोज आठसाठी तुमचे मशीनही चांगल्या क्षमतेचे असणे गरजेचे आहे. एचपीच्या या नव्या एन्व्ही २३ मध्ये ही अद्ययावतता पूर्णपणे भरलेली आहे. त्यामुळे यासोबत येणारी ऑपरेटिंग सिस्टीमही असणार आहे, िवडोज आठ. त्यामुळे खऱ्या अर्थाने जगातील अद्ययावततेचा अनुभव या मशीनवर घेता येईल.
एचपीने अद्याप भारतात याची अधिकृत घोषणा केलेली नसल्याने त्याची किंमतही नेमकी उपलब्ध नाही. मात्र बाजारपेठेतील सूत्रांनुसार याची किंमत ही ५० हजार रुपयांच्या पुढेच असेल. ती रु. ५५ हजार असण्याची शक्यता अनेकांना वाटते आहे.
विनायक परब
vinayak.parab@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2012 रोजी प्रकाशित
टचस्मार्ट डेस्कटॉप एचपी एन्व्ही २३- ऑल इन वन
आताच्या जमान्यात केवळ लॅपटॉप अल्ट्रास्मार्ट झाले आहेत, असे नव्हे तर आता डेस्कटॉपही टचस्मार्ट झाले आहे. स्मार्टनेसचा स्पर्श तर आता प्रत्येक उपकरणाला झालेला दिसतो. मग त्यात हे डेस्कटॉप मागे कसे बरे राहतील?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-12-2012 at 10:51 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Touch smart destop hp nv 23all in one