जागरूक नागरिक समितीच्या मोहिमेला वसईकरांचा मोठा प्रतिसाद
वसई परिसरातील गरीब नागरिकांना कपडय़ांचे वाटप
वापरात नसलेले जुने कपडे गोरगरिबांना देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी वसई जागरूक नागरिक समितीने सुरू केलेल्या स्प्रेडिंग स्माइल या मोहिमेला वसईकरांनी मोठा प्रतिसाद दिला. अवघ्या काही दिवसात विविध प्रकारचे दहा ट्रक कपडे जमा झाले. हे कपडे वसई आणि परिसरात राहणाऱ्या गरिबांना वाटून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले.
अनेकदा जुने झालेले कपडे किंवा फिट न बसणारे कपडे घरात पडून असतात. ते कचऱ्यात किंवा भांडेवाल्यांना देऊन टाकले जातात. परंतु अनेक गरीबांना या कपडय़ांचीे गरज असते, पण ते मिळत नाही. त्यामुळे असे वापरात नसलेले चांगले कपडे टाकून न देता ते दान करण्याचे आवाहन जागरूक नागरिक संस्थेने केले होते. त्यासाठी स्प्रेडिंग स्माइल ही मोहीम राबविण्यात आलीे होतीे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वसई- विरारमध्ये सुमारे ६० ठिकाणी कपडे गोळा करण्यासाठी केंद्रे उभारली होती. गावागावात जाऊन कार्यकर्त्यांनी लोकांना कपडे देण्याचे आवाहन केले होते. पापडीच्या बिग बाझार व्यवस्थापनाने हे कपडे ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.
जमा झालेले कपडे दिगोडी येथील गरीब मजूर वस्ती, पाचूबंदर येथील दत्तधाम वसाहत, उमेळा येथील कामगार वस्ती. वसई एसटी डेपोजवळ रस्त्यावर झोपणाारे, खारबाव येथील वीटभट्टीचे कामगार, कणेर येथील आदिवासी पाडय़ातील गरीब आणि गरजूंना वाटण्यात आले, असे संस्थेचे अध्यक्ष चिन्मय गवाणकर यांनी सांगितले. या मोहिमेसाठी उमा पाटील, मिलिंद राऊत, सुगंधा जोशी, वृषाली गडा, विक्रम खंडागळे, आशीष परुळेकर, अंकुर पराव, वेंचर मिस्किटा आदी कार्यकत्यरंनी विशेष परिश्रम घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2016 रोजी प्रकाशित
गोरगरिबांसाठी ‘स्प्रेडिंग स्माइल’
वसई जागरूक नागरिक समितीने सुरू केलेल्या स्प्रेडिंग स्माइल या मोहिमेला वसईकरांनी मोठा प्रतिसाद दिला
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-01-2016 at 01:43 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloths distribution to poor citizens in the vasai area