एमआयडीसीची जलवाहिनी शनिवारी संध्याकाळी अचानक फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. खिडकाळी मंदिराजवळ घडलेल्या या प्रकारामुळे हा सर्व परिसर जलमय झाला. तसेच ऐन गर्दीच्या वेळी कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या घटनेमुळे मुंब्रा, दिवा, कळवा तसेच विटावा या भागाला रविवारी संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकणार नाही, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. बारवी धरणापासून ठाण्याकडे जाणारी जलवाहिनी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान मोठा स्फोट होऊन फुटली. खिडकाळी मंदिरासमोर ही जलवाहिनी जमिनीखाली आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने तिचा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water shortage in mumbra kalwa and in diva