दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं अनेकांना त्रासदायक वाटतं. यामागे बहुतांश लोक कारण देतात की, हेल्मेट घातल्यानंतर डोक्याला घाम फुटतो, गरम अधिक होतं, त्यामुळे अजून त्रास होतो. पण, नागरिकांच्या याच समस्येवर बेंगळुरूच्या एका मॅकेनिकल इंजिनिअरने उपाय शोधला आहे. या इंजिनिअरने एक खास वातानुकुलीत हेल्मेट बनवलं आहे. याद्वारे दुचाकी चालवताना डोकं थंड राहतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक मल्टीनॅशनल कंपनीत इंजिनिअर असलेल्या संदीप दहियाला युजर फ्रेंडली उपकरणं बनवायला आवडतात. एसी हेल्मेट बनविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या घराचं रुपांतर चक्क एखाद्या गॅरेजप्रमाणे झालंय. गेल्या साडेचार वर्षांमध्ये आठ वेगवेगळे मॉडल डिझाइन केल्यानंतर अखेर एसी हेल्मेट बनवण्यात संदिपला यश आलं. ‘वातानुकूल’ असं या हेल्मेटला नाव देण्यात आलं आहे. हे एसी हेल्मेट बाइकच्या बॅटरीद्वारे सप्लाय होणाऱ्या डीसी पावर (12 व्होल्ट) वर कार्यरत असतं. कुलिंग इफेक्टसाठी अन्य कोणत्याही अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता नसते.

कसं काम करतं एसी हेल्मेट –
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, वातानुकूल नावाच्या या हेल्मेटचं वजन 1.7 किलोग्रामपेक्षाही कमी आहे. तर, बाजारात उपलब्ध असलेल्या अधिकांश हेल्मेटचं वजन 800 ग्राम ते 2 किलोग्रामच्या रेंजमध्ये असतं. एसी हेल्मेटचे दोन भाग आहेत. यातील एका भागात रबर ट्यूब आहे, याद्वारे हेल्मेटच्या आतमध्ये एअर सर्क्युलेशनचं काम होतं. तर, दुसरा भाग बॅकपॅकप्रमाणे असतो. यात रिव्हर्स थर्मो कपल, हीट ऐक्स्चेंजर, कंट्रोल आणि ब्लोअरचा समावेश आहे. हे एसी हेल्मेट घालून संदिप हे दररोज आपल्या घरून ऑफिसचा प्रवास करतात. गेल्या एका महिन्यापासून ते या हेल्मेटची अशाप्रकारे चाचणी घेत आहेत. “अनेकजण मला तुमच्या पाठीवर काय आहे याबाबत विचारतात. एसी हेल्मेटबाबत त्यांना सांगितल्यानंतर मात्र विचारणा करणारे लोकं हैराण होतात”, असं संदिप यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ac helmet developed by bengalur%e2%80%8bu techie sas