लग्नमंडपात सगळ्यांच्या साक्षीने लग्न करणारे जोडपे लाखो असतील, पण यातले काही जण असे असतात ज्यांना हटके काहीतरी करायचं असतं. असं काहीतरी करायचं असतं की त्यांचा हा विवाह सोहळा कायम लोकांच्या लक्षात राहिला पाहिजे आणि याच वेडाने झपाटले होते ते कॅलिफोर्नियाचे जेम्स आणि अॅश्ले हे जोडपं. आपले लग्न कायम आठवणीत राहिल अशा पद्धतीने त्यांना करायचे होते. तेव्हा या जोडप्याला सुचली एक भन्नाट कल्पना. त्यांनी जगातल्या सर्वोच्च शिखरावर लग्नगाठ बांधण्याचे ठरवलं. मग काय या दोन्ही जोडप्याने थेट नेपाळ गाठलं आणि माऊंट एव्हरेस्टवर लग्न करण्याचे ठरवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अनोख्या क्षणांचे छायाचित्र कॅमेरात कैद करण्यासाठी त्यांनी आपल्या सोबत इथल्या छायाचित्रकाराला देखील नेलं. पण एव्हरेस्टवर लग्न काही खायची गोष्ट नव्हती बरं का! एव्हरेस्ट सर करण्यासाठी आणि तिथल्या प्रतिकूल वातावरणात तग धरून राहण्यासाठी आवश्यक असे सारे प्रशिक्षण या दोघांनी घेतले आणि मगच तिथे जाऊन त्यांनी लग्न केले. माऊंट एव्हरेस्टच्या बेस कँम्पवर जमिनीपासून १७ हजार फूटांवर त्यांनी लग्न केले.

या जोडप्याचे फोटो काढण्याचा अनुभव फारच वेगळा होता असे छायाचित्रकार चार्ली चर्चील याने सांगितले. जेव्हा अॅश्ले आपल्या लग्नाचा पांढरा गाऊन घालून शिखरावर आली होती तेव्हा तिथलं तापमान होतं उणे ५ अंश सेल्शिअस. अशा वातावारणात दोघांचेही फोटो काढणं खूपच अवघड होतं, पण तरीही फक्त एका तासात आम्ही हा विवाहसोहळा आटोपला आणि घरी परतलो असेही अनुभव चार्लीने शेअर केला आहे. अॅश्ले आणि जेम्स या दोघांचेही माऊंट एव्हरेस्टवरचे हे फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनाही त्यांची ही हटके कल्पना आवडत आहे आता तुम्हालाही हे हटके लग्न आवडलं असेल तर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: California couple ties knot on mount everest