हल्ली वेडिंग फोटोग्राफीची क्रेझ खूपच वाढत चालली आहे. आपले फोटो हटके यावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्नात असतात. फोटोग्राफर्सही काहीना काही नवं ट्राय करत असतात, पण हे करत असताना जीवावर बेतू शकतं हे मात्र लोकांच्या लक्षात का येत नाही? चांगले फोटो यावे यासाठी लोकं आपला जीवही धोक्यात घालायला मागे पुढे पाहत नाही. चीनमधल्या एका फोटोग्राफरने तर वधूचा हटके फोटो काढण्यासाठी तिच्या वेडिंग गाऊनला चक्क आग लावली.  आता असं करून त्याला नक्की काय साधायचं होतं देवास ठावूक पण त्याच्या मूर्खपणामुळे या नववधूच्या पूर्ण कपड्यांना आग लागली. काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. नशिबाने फायर एक्सटिंग्विशरच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. पण नववधू मात्र आगीत होरपळून जखमी झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एखाद्याला काहीतरी हटके करावसं वाटणं साहाजिक आहे पण ते करण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालत आहोत हे लोकांच्या का लक्षात येत नाही. या फोटोग्राफरच्या मूर्खपणामुळे जीव गमवण्याची वेळ तिच्यावर आली असती. पण नशीब बलवत्तर होतं म्हणून ती थोडक्यात वाचली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हटके ट्राय करत वेगवेगळे फोटो काढणं यात काहीच गैर नाही पण त्या नादत आपण स्वत:चा जीव तर धोक्यात घालत नाही ना याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे नाहीतर या नववधूसारखी पश्चाताप करण्याची वेळ येईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese photographers put bride gown on fire to click perfect click