‘त्या झाडावर चेटकीण बसते हा! तिथे अजिबात जाऊ नको’ मोठ्यांच्या तोंडातलं हे वाक्य आणि ‘चेटकीण’ हा शब्द ऐकला तरी किती भीती वाटायची ना? चेटकीणीचे पाय वाकडे असतात, ती फारच भयानक दिसते, मानगुटीवर बसते, एकदा धरलं की सोडतं नाही, अशा कितीतरी गोष्टी आपण ऐकायचो आणि किती थरकाप उडायचा ना! मग त्या रात्रीच्या अंधारात वाऱ्याची साधी झुळूक जरी आली तरी चेटकीण किंवा भूतचं आलंय असं वाटून जी काही घाबरगुंडी उडायची ते आता आठवलं तरी हसू येतं. भूत, चेटकीण या साऱ्या अंधश्रद्धा असल्या तरी रात्रीच्यावेळी चुकून एखादी विचित्र आकृती दिसली तरी घाबरून जायला होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण पाकिस्तानमध्ये यापेक्षा जरा वेगळाच प्रकार पाहायला मिळला. इथल्या अंधाऱ्या रात्री भिंतीवर चक्क आकृती दिसली. ती चेटकीण आहे, असं काहींना वाटलं. आता हे कळल्यावर एखादा पळून जाईल. पण इथल्या लोकांना जशी ही गोष्ट कळली तसे ते चक्क त्या आकृतीचे फोटो काढायला तिथे धावले. एवढे की फोटो काढण्यासाठी तिथे गर्दी पाहायला मिळाली. पाकिस्तानी गायक फकिर मेहमूद याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. पण या फोटोमधली गंमत अशी आहे की हे जग सेल्फी आणि फोटोच्या नादात एवढं ठार वेडं झालंय की कुठेही काहीही करण्याचा त्यांचा वेडेपणा या एका फोटोतून स्पष्ट दिसतोय? आता ही चेटकीण वगैरे काही नाही. पण हा फोटो पाहून एवढ्या मजेशीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत की त्या वाचून तुम्हालाही हसू येईल, बघा काय म्हणतायत नेटिझन्स ते..

(ट्रेडिंग सेक्शनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या सोशल मीडियावर काय व्हायरल होतंय यावरून केलेल्या असतात. त्याची सत्यता पडताळून बघू शकत नाही.)

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chudail in pakistan hyderabad photo has gone viral