नेहमीच वेगळं काहीतरी देऊ पाहाणारं फेसबुक आता आणखी मोठा बदल करण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वीच फेसबुकने लाइव्ह व्हिडिओ संदर्भात दोन महत्त्वाचे फिचर्स आणणार असल्याचे सांगितले होते. आता पुढे एक पाऊल टाकत फेसबुक आणखी नवा बदल करण्याच्या मार्गावर आहे. तो बदल म्हणजे असा की आता युजर्सना त्यांच्या फेसबुक कव्हरमध्ये फोटो प्रमाणे व्हिडिओ देखील अपलोड करता येणार आहे. याची चाचणी सुरू असून, अनेकांना ‘फेसबुक पेज’वर हा बदल दिसतो आहे. याचे काम पूर्ण झाल्यानंतर युजर्सना हे फिचर वापरता येणार आहे. तेव्हा फोटोच नाही तर आयुष्यातल्या खास क्षणांचे व्हिडिओ देखील युजर्स अपलोड करू शकणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : ई-मेलमधील मजकूर स्कर्टप्रमाणे तोकडा असावा; दिल्ली विद्यापीठाच्या पुस्तकातील उल्लेख

या नव्या फिचर्सनुसार युजर्सना कव्हर पेजच्या ठिकाणी ३० ते ९० सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करता येणार आहे. पण हा व्हिडिओ कमी रिझोल्यूझनचा असणं गरजेचं आहे. याआधी युजर्सना प्रोफाईल फोटोच्या जागी व्हिडिओ अपलोड करता येत होता.  गेल्याच आठवड्यात फेसबुकने ‘Live Chat With Friends’ आणि ‘Live With’ हे दोन फिचर्स आणणार असल्याचे सांगितले होते. ‘Live Chat With Friends’ या पर्यायाचा वापर करून युजर्स लाईव्ह स्ट्रिमिंग होत असताना आपल्या मित्र मैत्रिणींसोबत चॅट करु शकतात. यापूर्वीच एखादा व्हिडिओ लाईव्ह होत असेल तर त्यावर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया यायच्या, पण आता या पर्यायामुळे तसं होणार नाही. समजा फेसबुकवर एखादा व्हिडिओ लाईव्ह होत असेल तर तुम्ही तुमच्या निवडक मित्र मैत्रिणींना तो पाहण्यासाठी आमंत्रण देऊ शकता. तसेच फेसबुकवरच्या निवडक मित्र मैत्रिणींशी गप्पाही मारता येणार आहे. ‘Live With’ या पर्यायाचा वापर करून इतरही युजर्सना तो व्हिडिओ पाहता येणार आहे. लॅण्डस्केप आणि पोर्ट्रेट अशा दोन्ही फ्रेममध्ये व्हिडिओच चित्रिकरण करता येणार आहे.
तेव्हा फेसबुकमध्ये हे तीन मोठे बदल युजर्सना पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook recently started testing facebook cover video