उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन हा किती क्रूर आहे हे वेळोवेळी जगाने पाहिले. २०१४ मध्ये किम जाँग उन याने आपले काका यांग साँग थेक यांच्यावर १२० कुत्रे सोडून त्यांना ठार केल्याची बातमी जगभर वाऱ्यासारखी पसरली होती. भुकेल्या कुत्र्यांनी लचके तोडून त्यांना ठार केले. हा क्रूर खेळ किमचे शेकडो अधिकारी आपल्या डोळ्यादेखत पाहात होते. वर्षभरापूर्वी त्याने आपल्या एका अधिकाऱ्याला तोफेच्या तोंडी दिले होते. गेल्यावर्षी ऑलिम्पिक सामन्यात पराभव स्विकाराव्या लागलेल्या खेळाडूंना त्यांनी खाणीत काम करण्याची शिक्षा सुनावली असल्याचे वृत्तही काही इंग्रजी दैनिकांनी दिलं होतं. किमच्या क्रौर्याचे हे काही एक दोन किस्से नाहीत. किमसारखा जगाच्या नाकी नऊ आणणारा हुकूमशहा भविष्यात उदयास येईल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. पण किमच्या रागीट स्वभावाची एक छोटीशी झलक नॉर्थ कोरियाच्या एजेंटला काही वर्षांपूर्वीच पाहायला मिळाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी स्ट्रॅटेजीचे माजी संचालक नाम सुंग वुकने किम जाँग उनच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. किमचा स्वभाव समजून घ्यायचा असेल तर ती घटना खूपच महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले. किमला खूप कमी वयातच धूम्रपान करण्याची सवय होती. किम जेव्हा १५ वर्षांचा होता, तेव्हा एका मुलीसोबत त्याचं प्रेमप्रकरण सुरू होतं. या मुलीशी तो गप्पाही मारायचा. जेव्हा शाळेत जाणाऱ्या किमला गर्लफ्रेंडने ‘तू धूम्रपान सोडून दे’ असा सल्ला दिला तेव्हा किमने अत्यंत वाईट पद्धतीने तिला ऐकवले. त्याने बोलताना शिवीगाळदेखील केली. त्याचे बोलणे इतके विक्षिप्त आणि अपमानास्पद होते की त्याच्या गर्लफ्रेंडला याचा धक्का बसलाच पण किमचे फोन टॅप करून संभाषण चोरून ऐकणाऱ्या एजंटना याचा सर्वाधिक धक्का बसला.

फक्त १५ वर्षांच्या मुलाचं वागणं आणि बोलणं इतकं वाईट होतं की भविष्यात हा मुलगा जर उत्तर कोरियाचा राजा झालाच तर या देशांतील लोकांचं जगणं किती अवघड होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. दुर्दैवाने त्यांची ही भीती काही वर्षांनी खरी ठरली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kim jong un treated his high school girlfriend when she told him to quit smoking