King Cobra Shocking Video Viral : जगातील सर्वात विषारी साप म्हणजे किंग कोब्रा. हा साप समोर दिसल्यावर भल्या भल्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. कारण या सापाच्या एका बाईटने माणसाचा जीव जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे किंग कोब्रा सापापासून लोक चार हात लांब राहणेच पसंत करतात. मात्र, एका घराच्या पंख्यावर हा किंग कोब्रा साप विळखा घालून बसल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे घरात राहत असतानाही लोकांनी सापांची भीती वाटते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. घरातील एका पंख्याच्या पातींवर कोब्रा साप विळखा घालून बसल्याचे घरातील माणसांनी पाहिले अन् संपूर्ण थरार कॅमेरात कैद केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किंग कोब्राचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहू शकता की, हा किंग कोब्रा पंख्यावर विळखा घालून बसलेला असतो. तो फणा काढून पंख्याच्या आजूबाजूला फिरण्याचा प्रयत्न करतो. पंख्याच्या पातीवर बसलेल्या या सापाला खाली उतरण्याचा मार्ग सापडत नाही. त्यामुळे त्या सापाची पंख्यावरच धडपड सुरु असते. किंग कोब्रा घरात घुसल्याचं कळताच घरच्या मंडळींनी त्याचा व्हिडीओ काढला आणि इंटरनेटवर व्हायरल केला.

नक्की वाचा – कुर्ला-मानखुर्द दरम्यान तरुणाची खतरनाक स्टंटबाजी, ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल, पोलीस म्हणाले,”कोणत्याही प्रवाशाने…”

इथे पाहा किंग कोब्राचा थरारक व्हिडीओ

किंग कोब्रा साप अत्यंत विषारी साप असून तो चावा घेण्यासाठी माणसांच्या अंगावरही धावतो. त्यामुळे या सापाला पकडताना सर्पमित्रांनाही खूप काळजी घ्यावी लागते. किंग कोब्रा जातीचे साप विशेषत: गवतात जास्त आढळतात. पण थंडीच्या दिवसात किंवा पावसाळी हंगामात हे साप गरमीसाठी घराच्या छतावर किंवा घरातील मोठ्या वस्तूंमध्ये लपण्याचा प्रयत्न करतात. या सापाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी ‘हर हर महादेव’ अशी प्रतिक्रिया देत सापाला देवाची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: King cobra wraps around ceiling fan in the house people see the snake and what happens next watch viral video on instagram nss