दिल्लीची लाईफलाईन म्हणून लोकप्रिय असणाऱ्या मेट्रो ट्रेनमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या वाढत्या संख्येबरोबरच प्रशासनाच्या कारभारवरही सवाल उपस्थित केले जातात. लोक मेट्रोमध्ये विनाकारण स्टंटबाजी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. दिवसेंदिवस असे धक्कादायक प्रकार वाढत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येतं. प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याशिवाय मेट्रोत रील बनवून हिरोगीरी करणाऱ्या प्रवासीही प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतात. एका तरुणाने धावत्या मेट्रो ट्रेनमध्ये बॅक फ्लिप मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या तरुणासोबत जे काही घडलं, ते पाहून तु्म्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, धावत्या ट्रेनमध्ये एक तरुण स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतो. बॅक फ्लिप मारण्याच्या नादात त्या तरुणाच्या डोक्याला लागल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. या तरुणाने खतरनाक स्टंट मारून एकप्रकारे स्वत:चा जीव धोक्यात टाकण्याचाच प्रयत्न केला.

नक्की वाचा – मेट्रो ट्रेनमध्ये बॅक फ्लिप मारायला गेला अन् जन्माची अद्दल घडली, आयुष्यभर विसरणार नाही

इथे पाहा व्हिडीओ

तरुणाची स्टंटबाजी पाहून मेट्रोतील प्रवासीही थक्क झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. @chaman_Flipper नावाच्या यूजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओला १ लाख ९० हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकरी या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही करत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, या प्रवाशावर कायदेशीर कारवाई करा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man performs dangerous stunts in delhi metro terrible video clip went viral on social media nss