‘नासा’ येत्या जून महिन्यात जगातील वजनाने सर्वात हलका असा उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. आनंदाची बाब म्हणजे अशी की तामिळनाडूत राहणाऱ्या १८ वर्षांच्या मुलाने हा उपग्रह बनवला आहे. नासा आणि ‘आय डुडल लर्निंग’ने आयोजित केलेल्या ‘क्युब इन स्पेस’ या स्पर्धेत चेन्नईचा रिफत शाहरुख सहभागी झाला होता. या स्पर्धेसाठी रिफतने हा उपग्रह बनवला. या उपग्रहाला त्याने ‘कलामसॅट’ असे नाव दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या उपग्रहाचे वजन आहे फक्त ६४ ग्रॅम आहे. दुसरी अभिमानाची बाब म्हणजे भारतीय विद्यार्थ्याने एका स्पर्धेत बनवलेला उपग्रह पहिल्यांदाच नासा प्रक्षेपित करणार आहे. हा छोटासा उपग्रह बनवणे खूपच आव्हानात्मक होते, असेही रिफतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. एका छोट्याशा ठोकळ्यात हा सॅटेलाईट बसवणे खूप कठीण काम होते पण रिफतने ते साध्य करून दाखवले. जगातील अनेक उपग्रहांवर अभ्यास करण्यात आल्यावर रफितने बनवलेला उपग्रह सर्वात हलका आणि लहान असल्याचे नासाने म्हटले आहे. २१ जूनला या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ही मोहिम २४० मिनिटांची असणार आहे आणि १२ मिनिटे हा उपग्रह अंतराळाच्या कक्षेत भ्रमण करणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rifath sharook made worlds lightest satellite kalamsat