सध्या एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल मेसेजमध्ये युजर्सना 1000GB इंटरनेट डेटा मोफत मिळेल अशा आशयाचा हा मेसेज आहे. जर तुम्हालाही अशाप्रकारचा मेसेज आला असेल तर अलर्ट राहण्याची गरज आहे. कारण हा एक खोटा मेसेज असून याद्वारे व्हॉट्स अॅपवर एक ‘स्कॅम’ सुरू आहे. यापूर्वीही नामांकित कंपन्यांच्या नावे विविध आकर्षक ऑफर असलेले असेच काही मेसेज व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाले होते. जाणून घेऊया काय आहे हा ‘स्कॅम’ –

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॉट्स अॅपचा हॅप्पी बर्थडे –

Whatsapp Offers 1000GB Free Internet या मथळ्याखाली असलेल्या व्हायरल मेसेजमध्ये, व्हॉट्स अॅप यावर्षी 10 वा जन्मदिन साजरा करत आहे. त्यामुळे ग्राहकांना 1000GB मोफत इंटरनेट डेटा दिला जातोय. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा असं म्हटलं आहे. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास एक पेज ओपन होतं. या पेजवर गेल्यास, ’10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तुम्हाला 1000GB मोफत इंटरनेट डेटाची ऑफर दिली जात आहे. यासाठी वाय-फायची देखील गरज नाही. मर्यादित कालावधीसाठीच ही ऑफर आहे. हा मेसेज तुम्ही तुमच्या ओळखीच्या 30 जणांना पाठवा’ असा संदेश दिसतो आणि विविध प्रश्नांची उत्तरं देण्यास सांगितलं जातं.

तज्ज्ञांनी दिला अलर्ट-
‘हा व्हायरल मेसेज म्हणजे एक स्कॅम आहे. युजर्सनी अजिबात अशाप्रकारच्या लिंकवर क्लिक करु नये. अशाप्रकारच्या स्कॅमला ‘क्लिक फ्रॉड’ असं म्हटलं जातं. या मेसेजमध्ये व्हायरल असल्याचं सध्यातरी आढळलेलं नाही, पण अशा मेसेजद्वारे घोटाळेबाज खूप पैसा कमावतात. या मेसेजसोबत ज्या युआरएलवर क्लिक करण्यास सांगितलं जातंय ते संकेतस्थळ व्हॉट्सअॅपचं अधिकृत संकेतस्थळ नाहीये. हे मेसेज घोटाळेबाजांकडून युजर्सची फसवणूक करण्यासाठी बनवले जातात परिणामी युजर्सनी अशा मेसेजपासून दूर रहावं आणि क्लिक करु नये’, असं सायबर सिक्युरिटी फर्म ESET ने म्हटलं आहे. यापूर्वी अदिदास,अॅमेझॉन, रोलेक्स अशा कंपन्यांबाबतही असेच काही आकर्षक ऑफर असलेले मेसेज व्हायरल झाले होते. अशा मेसेजद्वारे घोटाळेबाज तुमची खासगी माहिती चोरण्याचीही दाट शक्यता असते. त्यामुळे युजर्सनी अशाप्रकारच्या मेसेजपासून सावध राहण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp happy birthday message scam no any offer of 1000gb free data sas