अभिनेता, सूत्रसंचालक असलेल्या आयुषमान खुरानाचे 'इक वारी हां कह दे' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यासाठी त्याने भाऊ अपारशक्ति याच्यासोबत पहिल्यांदाच काम केले आहे. या दोघांनी मिळून हे गाणे लिहले असून त्यास संगीतबद्धही केलेय. या गाण्यात अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आएशा शर्मा हीदेखील दिसेल. 'इक वारी हां कह दे' गाण्याचे दिग्दर्शन प्रदीप सरकारने केले आहे.