[ie_dailymotion id=x7g1kbe] ‘पार्श’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्याची संपूर्ण टीम ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ शोमध्ये गेली होती. त्यावेळी अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी हिची त्वचेच्या रंगावरुन वारंवार खिल्ली उडवली गेली होती. या कार्यक्रमामध्ये तनिष्ठाची तिच्या सावळ्या वर्णावरुन ‘काली कलूटी’, ‘तू जास्त ‘ब्लॅकबेरी’ खाल्ल्या असशील’, ‘मू काला है’ असे म्हणत खिल्ली उडवण्यात आली होती.